कवठे येथील भेदिक शाहीर कळसकर पार्टीचा 50 वा वर्धापनदिन
सातारा, दि. 19 - आजच्या धकाधकीच्या जिवनात अनेक कलांचा र्हास होत चालला असताना भेदिक कला जिवंत ठेवत गेले 50 वर्षे कार्यरत असणार्या कवठे येथील भेदिक शाहीर कळसकर आणि पार्टीचे कार्य एखादया दिपस्तंभासारखे असल्याचे प्रतिपादन सह्याद्री कारखान्याचे माजी संचालक लालासाहेब पाटील कवठेकर यांनी केले. अध्यक्षस्थानी शाहीर कळसकर आणि पार्टीचे अध्यक्ष शाहीर डी.जी.कळसकर होते.
कराड तालुक्यातील कवठे मसूर येथील शाहीर कळसकर आणि पार्टीच्या 50 व्या वर्धापनदिन कार्यक्रमात बोलत होते. ते पुढे म्हणाले 1967 साली स्थापन झालेल्या या पार्टीने आजपर्यंत महाराष्ट्राच्या कानाकोपर्यात आपली कला सादर करून कवठे सारख्या ग्रामीण भागाचे नाव आवघ्या महाराष्ट्रात केले. एखादी कला आत्मसात करून त्या कलेतून अध्यात्म जनमानसात रूजवत अध्यात्मापासून दूर गेलेल्यांना आत्मज्ञान देण्याचे कार्य करत असलेल्या या शाहीरी पार्टीचा सुवर्णमहोत्सव साजरा व्हावा अशा शुभेच्छा त्यांनी दिल्या.
1967 मध्ये स्थापना केलेल्या आमच्या भेदिक शाहीरी मंडळात स्थापनेपासून तेच कलाकार आहेत. व या कलाकारांच्या साथीमुळेच आम्ही 50 वा वर्धापनदिन साजरा करू शकलो हे आमचे भाग्यच समजतो. या कलेवर आम्ही करत असलेल्या प्रेमामुळेच आमचा नावलौकीक सर्वदूर पोहचवण्यात आम्हाला यश आले असल्याचे शाहीर डी. जी. कळसकर यांनी सांगितले. प्रारंभी मंडळाचे सद्गुरू दिवंगत दादुमियाँ चाँदमुल्ला यांच्या प्रतिमेचे पूजन ग्रामपंचायतीचे माजी सदस्य चंद्रकांत काशीद यांनी केले. तर बलुतेसमाज विकास मंडळ कवठेचे अध्यक्ष विठ्ठल सुतार यांनी श्रीफळ वाढवून कार्यक्रमाची सुरूवात झाली. कार्यक्रमास भिकू शिंदे, निवृती नांगरे, अशोक काशीद, नानासो कुंभार, तानाजी कुंभार, हणमंत मोहिते, गुरूदास कळसकर, रघुनाथ किरत,सुनिल वायदंडे, चंद्रकांत काशीद, विठ्ठल पुजारी,दिलीप माने, जगन्नाथ कुंभार, शिवाजी गायकवाड इत्यादी सदस्यासह माजी उपसरपंच मोहन यादव,राजाराम मोहिते,जितेंद्र किरत व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.उध्दव काशीद यांनी उपस्थितांचे स्वागत केले तर सुभाष कुंभार यांनी आभार मानले.