होमगार्ड दलात अनुशेष भरतीसाठी नोंदणी
नाशिक/प्रतिनिधी। 15 - नाशिक जिल्हा होमगार्ड दलातील अनुशेष भरणेकामी 17 जुलै 2016 रोजी सकाळी 7.00 वाजेपासून आडगांव येथील नाशिक ग्रामीण पोलीस मुख्यालयातील कवायत मैदानावर होमगार्ड नोंदणी कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. होमगार्ड सदस्य नोंदणीसाठी पुरुषांसाठी वय 20 वर्षे ते 50 वर्षे, शिक्षण 10 वी उत्तीर्ण, उंची 162 से.मी., छाती न फुगवता 76 से.मी. फुगवून 81 से.मी. आणि महिलांसाठी वय 20 वर्षे ते 50 वर्षे, शिक्षण 10 वी उत्तीर्ण, उंची 150 से.मी. अशी पात्रता आहे. उमेदवाराचा पोलिस चारित्र्य पडताळणी अहवाल अनुकुल असावा. शारिरिक विकलांगता असलेले उमेदवार नोंदणीसाठी अपात्र असतील. बेरोजगार व्यक्ती होमगार्ड नोंदणीसाठी अपात्र असतील. यापुर्वी संघटनेत असलेले परंतु गैरशिस्त, अफरातफर न्यायालयीन प्रकरणी दोषी असलेले होमगार्डस नोंदणीसाठी अपात्र असतील. उमेदवार हा नाशिक जिल्ह्यातील रहिवासी असणे आवश्यक आहे.
पुरुष उमेदवार्यांसाठी गोळाफेकीत 7260 किलोग्रॅम वजनाचा गोळा व 1600 मीटर धावणे आणि महिला उमेदवार्यांसाठी 4 किलोग्रॅम वजनाचा गोळा व 800 मीटर धावण्याची शारिरिक चाचणी असेल. होमगार्ड सदस्य नोंदणीसाठी इच्छुक उमेदवारांनी कागदपत्रांच्या मुळ प्रत व साक्षांकित प्रतीसह 17 जुलै 2016 रोजी स्वखर्चाने आडगांव येथील नाशिक ग्रामीण पोलीस मुख्यालयातील कवायत मैदानावर उपस्थित व्हावे. रहिवाशी पुराव्या करीता आधार कार्ड, मतदान ओळखपत्र, शिधापत्रिका यापैकी एक आणि शैक्षणिक पुराव्याकरिता आवश्यक शैक्षणिक अर्हता प्राप्त केल्याचे प्रमाणपत्र सोबत असणे आवश्यक आहे. जन्म दिनांक पडताळणीकरिता इयत्ता 10 वी चे बोर्ड प्रमाणपत्र, उमेदवाराचे दोन पासपोर्ट साईज फोटो, एक अधिकृत फोटो आय.डी. पुरावा असणे आवश्यक आहे. महिला उमेदवारांनी वडीलांचे, पतीचे, कुटुंब प्रमुखांचे नाहरकत प्रमाणपत्र, उमेदवार शासकिय, निमशासकिय, खाजगी सेवेत असतील तर कार्यालय प्रमुख, मालकाचे नाहरकत प्रमाणपत्र आणि एनसीसी, माजीसैनिक, खेळाडु (जिल्हास्तरीय स्पर्धेत सहभाग प्रमाणपत्र) आयटीआय, जडवाहन चालक, नागरी संरक्षण सेवेत तीन प्रशिक्षण पुर्ण केलेले उमेदवारांनी त्यासंदर्भातील मुळ प्रमाणपत्रे आणणे आवश्यक आहे, असे प्रशांत मोहिते, अपर पोलिस अधिक्षक तथा जिल्हा समादेशक, होमगार्ड, नाशिक यांनी कळविले आहे.