Breaking News

सर्वदुर पावसाने बळीराजा सुखावला

बुलडाणा, दि. 11 - एक-दोन पावसाचा अपवाद वगळता जिल्ह्यात सार्वत्रीक आणि दमदार पाऊस झाला नव्हता. त्यामुळे बळीराजा चातका सारखी वरुणराजाची वाट पाहत होता. ही प्रतिक्षा गेल्या 24 तासात संपली असून जिल्ह्यात सर्वत्र दमदार पावसाला सुरुवात झाली आहे. विशेषत: सिंदखेडराजा आणि लोणार तालुक्यात समाधानकारक पाऊस झाला आहे. तर उर्वरीत तालुक्यात दमदार पाऊस होत आहे. गेल्या 24 तासात जिल्ह्यात 178.3 मि.मि. पावसाची नोंद झाली आहे. तर येत्या 24 तासात पुन्हा सार्वत्रीक पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. यावर्षी अलनिनोचा प्रभाव ओसरल्याने लवकर आणि भरपूर पावसाची शक्यता वर्तविली जात होती. परंतु मृग नक्षत्र कोरडेच गेले. प्रत्यक्ष पेरणीला सुरुवात 18 जून दरम्यान झाली.भरपूर पावसाचे संकेत असलेतरी पेरणीनंतर जेमतेमच पाऊस झाला होता. त्यामुळे शेतकरी वर्गाला दमदार पावसाची प्रतिक्षा होती. ती गेल्या 24 तासात पुर्ण झाली असून जिल्ह्यातील जवळपास सर्वच तालुक्यात पावसाने हजेरी लावली आहे. गेल्या 24 तासात सिंदखेडराजा तालुक्यात सर्वाधीक 45 मि.मि. पावसाची नोंद झाली. त्या खालोखाल लोणार 40 मि.मि., चिखली 37 मि.मि., पावसाची नोंद झाली. तर बुलडाणा, मेहकर, मलकापूर, मोताळा, नांदुरा, खामगाव,
शेगाव, जळगाव जामोद, संग्रामपूर तालुक्यात समाधानकारक पावसाला सुरुवात झाली आहे. पुढील 48 तासात आणखी पाऊस होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

 मागील वर्षीपेक्षा जास्त पाऊस

मागील वर्षी 86 टक्के पाऊस झाला होता. 90 टक्केपेक्षा कमी पाऊस झाल्यास तो कोरडा दुष्काळ गणल्या जातो. यावर्षी मात्र पावसाचे चांगले संकेत असून जूनमध्ये 90 टक्के, जुलै 110 टक्के, ऑगस्ट 116 टक्के, सप्टेंबर 120 टक्के असा वाढता क्रम राहणार असल्याचे द्भषी विशगाचे म्हणणे आहे. यावर्षी 106 टक्के पाऊस राज्यात होणार असून अकोला विशगात सर्वाधीक म्हणजे 116 टक्के पावसाची शक्यता वर्तविल्या जात आहे.