Breaking News

एमआयएमसह 191 राजकीय पक्षांची नोंदणी रद्द

मुंबई, दि. 14 -  ‘एमआयएम’सह 191 पक्षांची नोंदणी राज्य निवडणूक आयोगाने रद्द केली आहे. आयोगाने मागितलेली आवश्यक कागदपत्रे सादर न केल्याने आयोगाने राज्यातील एमआयएमची नोंदणीच रद्द केली आहे.
तसेच आगामी निवडणुका लढवण्यास बंदी घातली. दरम्यान, एमआयएमने आयोगाच्या निर्णयावर याचिका दाखल करण्याची तयारी सुरू केली.
महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाने काही राजकीय पक्षांना त्यांची प्राप्तिकर विवरणपत्रे व लेखा परीक्षण लेखाची प्रत सादर करण्याचे आवाहन केले होते. त्यापैकी ज्या पक्षांनी ही कागदपत्रे सादर केली नाहीत, त्या 191 पक्षांना आयोगाने नोटीस बजावून त्यांची नोंदणी आणि चिन्ह गोठवण्याची कारवाई केली. या 191 पक्षांमध्ये ‘एमआयएम’ पक्षाचाही समावेश आहे.