रत्नागिरी नदी-धरणांतील पाणीसाठ्यांत वाढ!
रत्नागिरी, दि. 08 - जिल्ह्यात गेले पंधरा दिवस पडलेल्या मुसळधार पावसामुळे धरणांत पाणीसाठा वाढला असून नद्यांच्या पाण्याच्या पातळीतही वाढ झाली आहे; मात्र पावसाने आता विश्रांती घेण्यास सुरुवात केली आहे.
गेले अर्धा महिना जिल्ह्यात पावसाने जोरदार हजेरी लावली होती. धरणक्षेत्रात पडलेल्या पावसामुळे धरणांतील पाणीसाठयात वाढ झाली आहे.
खेड तालुक्यात एक, राजापूर तालुक्यात एक आणि संगमेश्वर तालुक्यात एक असे तीन मध्यम पाटबंधारे प्रकल्प असून; एकूण प्रकल्पीय उपयुक्त पाणीसाठा क्षमता 184.69 दशलक्ष घनमीटर इतका आहे. तर 7 जुलै रोजीचा पाणीसाठा 146.49 दशलक्ष घनमीटर इतका आहे. खेड तालुक्यात नातुवाडी मध्यम प्रकल्पाचा एकूण प्रकल्पीय पाणीसाठा क्षमता 27.23 दशलक्ष घनमीटर असून; 7 जुलैअखेर 11.90 दशलक्ष घनमीटर पाणीसाठा आहे. याची टक्केवारी 43.69 इतकी आहे.
राजापूर तालुक्यात अर्जुना मध्यम प्रकल्पाचा प्रकल्पीय पाणीसाठा क्षमता 72.56 दशलक्ष घनमीटर असून 7 जुलैअखेर 70.17 दशलक्ष घनमीटर पाणीसाठा आहे. संगमेश्वर तालुक्यातील गडनदी प्रकल्पाचा प्रकल्पीय पाणीसाठा क्षमता 82.90 दशलक्ष घनमीटर असून 7 जुलैअखेर 64.42 दशलक्ष घनमीटर पाणीसाठा आहे. याशिवाय जिल्ह्यात 60 लघुपाटबंधारे प्रकल्प असून; त्यांची एकूण प्रकल्पीय पाणीसाठा क्षमता 259.59 दशलक्ष घनमीटर इतकी आहे. आज रोजीचा साठा 176.42 दशलक्ष घनमीटर इतका आहे. 60 लघुपाटबंधारे प्रकल्पांपैकी 25 लघुपाटबंधारे शंभर टक्के भरले आहेत.
दरम्यान, जगबुडी, वाशिष्ठी, काजळी, कोदवली, शास्त्री, सोनवी आणि मुचकुंदी या प्रमुख नद्यांचीही पाणी पातळी वाढली आहे. जिल्ह्यात 7 जुलै रोजी सकाळी 8 वाजता संपलेल्या 24 तासांत एकूण 156 मि.मी. तर सरासरी 17.3 मि.मी. पाऊस झाला आहे.