केंद्र सरकार आर्थिक वर्ष बदलण्याच्या तयारीत
नवी दिल्ली, दि. 08 - भारताचे आर्थिक वर्ष दरवर्षी 1 एप्रिल रोजी सुरू होऊन 31 मार्चला संपते. या वर्षभरात नागरिकांना, कंपन्यांना व गुंतवणूकदारांना त्यांचे आर्थिक व्यवहार पूर्ण करावे लागतात. आता केंद्रातील मोदी सरकारने हे आर्थिक वर्ष बदलण्याच्या हालचाली सुरू केल्या असून त्याच्या अभ्यासासाठी समिती नेमली आहे.
अर्थखात्याचे माजी मुख्य आर्थिक सल्लागार शंकर आचार्य यांच्या अध्यक्षतेखाली एक विशेष समिती नेमण्यात येणार आहे. या समितीत कॅबिनेट सचिव के. एम. चंद्रशेखर, तामिळनाडूचे माजी वित्त सचिव पी. व्ही. राजारामन, सेंटर फॉर पॉलिसी रिसर्चचे सीनियर फेलो राजीव कुमार यांचा समावेश आहे.
मान्सून, सांख्यिकी, माहितीचे संकलन, आर्थिक वर्ष बदलताना विविध व्यवसायांवर काय परिणाम होतील, याची चर्चा शंकर आचार्य यांची समिती करेल. सर्व काही सुरळीत झाल्यास सरकार 1 जानेवारी ते 31 डिसेंबर हे नवीन आर्थिक वर्ष जाहीर करू शकेल.