Breaking News

शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटूंबियांना मदतीचा ठराव

बुलडाणा, दि. 12 - महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाच्या बुलडाणा जिल्हा शाखेच्यावतीने आज विविध मागण्यांचे निवेदन अप्पर जिल्हाधिकारी शिवानंद टाकसाळे यांना देण्यात आले. याप्रसंगी अधिकारी महासंघाचे बुलडाणा कार्यकारणीचे कायम निमंत्रित अति. मुख्य कार्यकारी अधिकारी बी.बी. नेमाने, सरचिटणीस जिल्हा कोषागार अधिकारी निलेश नलावडे, कोषाध्यक्ष गटविकास अधिकारी आर. एस लोखंडे, जिल्हा नियोजन अधिकारी दिपक सिडाम, उपविभागीय अधिकारी बाळासाहेब तिडके, सहा. जिल्हा नियोजन अधिकारी श्री. वायाळ, तहसीलदार दिपक बाजड, वैद्यकीय अधिकारी श्री. निकस, तहसीलदार मनीष गायकवाड आदी उपस्थित होते.
या निवेदनानुसार, जुनी पेन्शन योजना व नवीन पेन्शन योजना यापैकी एक निवडण्याची मागणी करण्यात आली  आहे. तसेच 7 वा वेतन आयोग योग्य सुधारणांसह राज्यात विनाविलंब लागू करावा, सर्व रिक्त पदे भरावी, कंत्राटीधोरण रद्द करावे, विभागीय संवर्ग बदल्यांमधून महिलांना वगळण्यात यावे, सर्व बदल्या ग्रामविकास विभागाप्रमाणे समुपदेशन पद्धतीने कराव्यात आदी मागण्या करण्यात आल्या आहेत.
त्याचप्रमाणे राजपत्रित अधिकारी महासंघाच्या आजच्य बैठकीत शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटूंबियांना आर्थिक मदत करण्याचा ठराव घेण्यात आला. त्यानुसार सर्व अधिकारी व कर्मचारी शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटूंबियांच्या मदतीसाठी हातभार लावतील. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी शिवानंद टाकसाळे, अति. मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. नेमाने यांनी मार्गदर्शन केले. बैठकीची माहिती सरचिटणीस श्री. नलावडे यांनी दिली. याप्रसंगी महासंघाचे पदाधिकारी उपस्थित होते.