Breaking News

जिल्ह्यात पावसाचा जोर, पूर्वभागात तुरळक

सांगली, दि. 23 - सांगली जिल्ह्यात पुन्हा पावसाचा जोर वाढला असून पश्‍चिम भागात जोरदार तर दुष्काळी पूर्वभागात तुरळक स्वरुपात सरी कोसळत आहे. पश्‍चिम भागासह सांगली, मिरजेत आज दिवसभर संततधार चालू होती.19 जुलैच्या रात्री पुन्हा .......... नक्षत्राची सुरुवात झाली. तीन दिवस अधून-मधून पाऊस पडत होता. परंतु या नक्षत्राने आज चांगलाच जोर धरलाय. सकाळी 11 वाजता सुरु झालेला पाऊस सतत चालूच होता. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले. दिवसभर सूर्यदर्शन घडले नाही. सध्याचा जिरवणीचा पाऊस असून तो उगवून आलेल्या पिकाच्या वाढीला पोषक असल्याचे मत शेतकरी व्यक्त करीत आहे.या पावसाने शहरात दैना उडून गेली असून रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य पसरले आहे. गुंठेवारीचा नेहमीचाच प्रश्‍न भेडसावत आहे. सायंकाळी हवेत गारठा वाढला आहे.