Breaking News

विवाहितेचा खून ः पती, सासूला जन्मठेप

सांगली, दि. 10 - चारित्र्याचा संशय घेऊन विवाहितेला जाळून मारल्याबद्दल पती आणि सासूला जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली. जिल्हा सत्र न्यायालयाने आज निकाल जाहीर केला.
याबाबत अधिक माहिती अशी की, ज्योती सर्जेराव शिरतोडे (रा. अंजनी, ता. तासगांव) हिचा विवाह सागर आनंदा चव्हाण (रा. पाटगांव, ता. मिरज) याच्याशी झाला. लग्नानंतर पती सागर चव्हाण, सासू इंदूबाई चव्हाण हे दोघे चारित्र्याचा संशय घेऊन वारंवार तिला मारहाण करत होते. शिवीगाळ करत होते, शारिरीक, मानसिक छळ करु लागले.
29 ऑगस्ट 2013 रोजी सकाळी 9.30 च्या सुमारास पती आनंद, सासू इंदूबाई यांनी पुन्हा ज्योतीला चारित्र्यावरुन विचारणा केली. तुझे कोणाबरोबर संबंध आहेत ते सांग असे म्हणून तिला शिवीगाळ, मारहाण केली. सागरने कामावर जाण्याआधी आईला (इंदूबाई) ज्योतीचे ज्याच्याशी संबंध आहेत त्याचे नांव सांगते बघ नाही तर रॉकेल ओतून तिला पेटवून टाक असे बजावले. त्यानंतर इंदूबाईने ज्योतीला रॉकेल ओतून पेटवून दिले.
ज्योती होरपळून गंभीर जखमी झाली. तिला उपचारासाठी सांगलीतील आदित्य हॉस्पिटलमध्ये दाखल केले. उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. मृत्यूपूर्वी तिने पोलिसांना पेटवून दिल्याबाबत जबाब दिला. ज्योतीचे वडील सर्जेराव शिरतोडे (रा. अंजनी, ता. तासगांव) यांनी मिरज ग्रामीण पोलिसात फिर्याद नोंद केली.
याप्रकरणी पोलिसांनी तपास केला. तत्कालिन स.पो.नि. एस.ी. कांबळे यांनीतपास केला. न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. सरकारतर्फे 8 साक्षीदार तपासले. मयत ज्योतीचा मृत्यूपूर्व जबाब, फिर्यादी आणि साक्षीदारांचे जबाब, वैद्यकीय अहवाल आदी पुराव्यांच्या आधारे न्यायालयाने पती सागर चव्हाण (वय 25), सासू इंदूबाई चव्हाण (वय 44) या दोघांना जन्मठेप आणि प्रत्येकी 1 हजार रुपये दंड, दंड न दिल्यास दोन महिने कैद अशी शिक्षा ठोठावली.