Breaking News

सेरेनाची स्टेफी ग्राफशी बरोबरी

लंडन, दि. 10 - जागतिक क्रमवारीतील अव्वल महिला टेनिसपटू अमेरिकेच्या सेरेना विलियम्सने विम्बल्डन महिला एकेरीचं जेतेपद मिळवलं आहे. सेरेना  विल्यम्सने अंतिम फेरीत अँजेलिक कर्बरचा 7-5, 6-3ने पराभव करत विम्बल्डन स्पर्धा जिंकली आहे. सेरेना विल्यम्सने सातव्यांदा विम्बल्डनच्या जेतेपदावर नाव  कोरले आहे. सेरेना विल्यम्सच्या कारकिर्दीतील हे 22वं ग्रँडस्लॅम जेतेपद आहे. या विजयासह सेरेनाने जर्मनीच्या स्टेफी ग्राफच्या 22 ग्रँडस्लॅम विजेतेपदांच्या  विक्रमाची बरोबरी केली आहे.