Breaking News

मध्ये प्रदेशमध्ये पावसाचे थैमान

भोपाळ, दि. 10 - मध्य प्रदेशमध्ये गेले काही दिवस कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे नद्यांना पूर आला असून, आतापर्यंत किमान 11 नागरिकांचा बळी गेल्याचे  वृत्त आहे. सैन्यदलाच्या जवानांनी पूरप्रवण क्षेत्रातून सुमारे 400 नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविले असूून, बचतकार्य सुरू आहे. 
राज्यात गेल्या तीन-चार दिवसांपासून जोरदार पाऊस कोसळत आहे. नर्मदा नदीने धोक्याची पातळी ओलांडली असून, विविध कारणांमुळे आठ नागरिकांचा मृत्यू  झाल्याची माहिती मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी आज पत्रकारांशी बोलताना दिली. आतापर्यंत पावसाने भोपाळ येथे दोन तर तिकामगड, रेवा, झाबुवा,  बेतूल, रायसेन व पन्ना याठिकाणी प्रत्येकी एका नागरिकाचा बळी गेला आहे. सहारणपूर येथेही एक जण वाहून गेल्याचे सिन्हा यांनी सांगितले.