दबंग दिल्लीचा पाटण्याला दणका
पाटणा, दि. 10 - प्रो कबड्डी लीगमध्ये पाटणा पायरेट्सचा पहिला पराभव करीत दिल्लीने दुसर्या विजयाची नोंद केली. काशिलिंग आडकेऐवजी इराणच्या मेराज शेखच्या नेतृत्वाखाली खेळणार्या दबंग दिल्लीने घरच्या मैदानावर पाटणा पायरेट्सला 33-15 असे नमवत सनसनाटी विजयाची नोंद केली. भेदक चढाया आणि अफलातून डावपेच रचणारा मेराजच दिल्लीच्या विजयाचा शिल्पकार ठरला. अन्य लढतीत प्रत्येक सामन्यागणिक कामगिरीत सुधारणा करणार्या पुणेरी पलटण संघाने प्रो कबड्डी लीगमध्ये बंगालवर 38-31 मात करत बाद फेरीच्या दिशेने दमदार पाऊल टाकले.
घरच्या मैदानावर झंझावाती प्रदर्शन करणार्या पाटण्याविरुद्ध दबंग दिल्ली संघाने सर्वागीण खेळ करत मध्यंतराला 11-7 अशी आघाडी मिळवली. दिल्लीने पाटण्यावर लोण चढवताना 17-8 आगेकूच केली. अवघ्या सहा मिनिटांत दुसरा लोण चढवत त्यांनी 26-9 अशी भक्कम आघाडी घेतली. ही आघाडी सातत्याने वाढवत दिल्लीने दिमाखदार विजय साकारला. मेराज शेखने 6 तर पकडपटू सचिन शिंगाडेने 4 गुण मिळवले.