Breaking News

रस्त्यावरील लढाई तुम्ही लढा,सभाग्रहातील आम्ही लढु-आ.पंडीत

परभणी/प्रतिनिधी, दि. 12 - मराठवाड्यासह जिल्ह्यातील शेतकर्‍यांचे व कामगारांचे प्रश्‍न विधीमंडळात मांडुन शेतकर्‍यांसह कामगारांच्या प्रश्‍नांवर सरकारचे लक्ष केंद्रीत करू असे  अश्‍वासन आ.भाई पंडीत यांनी शहरातील अग्रवाल मंगल कार्यालयात झालेल्या संघर्ष मेळाव्यात बोलतांना दिले.
शहरातील अग्रवाल मंगल कार्यालयात दि.11 जुलै रोजी संघर्ष मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.या मेळाव्याच्या अध्यक्ष स्थानी शेकापचे राज्य खजीनदार भाई लक्ष्मणराव गोळेगावकर होते तर भाई काका शिंदे,पक्षनिरिक्षक भाई अनिल पाटील,महात्मा फुले शिक्षक परिषदेचे अध्यक्ष व्यंकटराव जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती.या वेळी बोलतांना भाई आ.पंडीत पाटील यांनी शेतकर्‍यांच्या आत्महत्या सत्रावर शोकव्यक्त करत शेतकर्‍यांनी हवालदिल होउन मृत्युला कवटाळण्यापेक्षा संकटाशी दोन हात करण्याची हिंम्मत ठेवावी असे सांगत या अधिवेशनात आपण शेतकर्‍यांसह  कामगारांच्या ज्वलंत प्रश्‍नावर सरकाचे लक्ष केंद्रीत करून सरकारला ठोस निर्णयात्मक भुमिका घेेण्यास भाग पाडु असे आश्‍वासन देत शाळेतिल खिचडी शिजवणार्‍या कामगारांसाठी लक्षवेधी प्रश्‍न उपस्थित करून सरकारला ठोस भुमिका घेवून शरण येण्यासाठी भाग पाडु असे सांगतानांच रस्त्यावरची लढाई तुम्ही लढा सभाग्रहातील लढाई आम्ही लढू असे निवार्णीचे आवाहन करत उपोशितांच्या रक्तात चैतन्य निर्माण केले.
 या संघर्ष मेळाव्याचे आयोजन कॉ.र्कितीकुमार बुरांडे यांनी केले होते तर या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर शेतकरी व कामगार बांधव उपस्थित होते.या वेळी मंचावर भाई काका शिंदे,भाई र्कितीकुमार बुरांडे व मान्यवरांचे भाषणे झाली.हा संघर्ष मेळावा यशस्वी करण्यासाठी इंद्रजित आहेर,लक्ष्मण जोगदंड,बालासाहेब बाभट,लक्ष्मण मुळे,अमर मगर,रवि गवारे,पंढरीनाथ मुळे,सुभाष मुळे,मिलिंद बुरांडे,रामभाऊ गवते,हरीभाऊ देशमुख,रवि कांबळे आदींनी प्रयत्न केले.