धो..धो...पावसाने जिल्ह्यातील झाले नद्या-नाले एक
जिल्ह्यात सरासरी 196.65 मि.मी. पावसाची नोंद; पुर्णा तालुक्यात सर्वाधिक पावसाची नोंद
परभणी / प्रतिनिधी ः दि. 12 - गेल्या आठ दिवसापासुन आकाशातील ढगांची शांतता आणि फोवार्या सारखे वार्यातुन भरकटणारे पावसाचे थेंब शेतकर्यांसह सर्वांच्याच मनाला आनंद देणारे ठरले. परंतु नद्यांना पाण्याची झुळूकही बघायला मिळत नसल्याने सर्वांनाच चिंतेचा प्रश्न वाटत होता. परंतु गेल्या दोन दिवसांपासुन जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात धो....धो.पावसाला सुरुवात झाली आणि बघता-बघता जिल्ह्यातील सर्वच जलस्त्रोत तुडूंब भरुन वाहायला लागले आहेत.गेल्या तिन वर्षापासुन सतत दुष्काळाचा सामना करावा लागलेल्या परभणी सह मराठवाड्याला या वर्षी चांगल्या पावसाची नितांत आवश्यक्त आहे. त्याच मोठ्या अपेक्षेने चकोप्रक्षाप्रमाणे आभाळाकडे नजरा लावून बसलेल्या लोकांच्या मनात समाधान बघायला मिळाले ते दिनांक 11 जुलै रोजी जिल्ह्यात सर्वदुर झालेल्या मुसळधार पावसाने. दिनांक 11 जुलै रोजी सकाळपासुन पाऊस सुरुवा होणार असल्याचे संकेत देत होता. आकाशातुन फवारा मारल्यागत पावसाचे थेंबांमुळे वातावरण ओलसर होत होते त्यातच दुपारी 1.30 च्या दरम्यान आभाळातील ढगांनी जिल्ह्यासह परिसरात रस्ता शोधला आणि येथील तहानलेल्या नद्यांना तृप्त करण्यास सुरुवात केली. जवळपास लगात तिन घंट होत असलेल्या वरुण राजाच्या संथगती थैयथैयाटाने जिल्ह्यातील नदी-नाले क्षणात एक होण्यास सुरुवात झाली. तत्पुरी नाशिक परिसरात मुसळधार पावसाने गोदावीर नदीचे पात्र तुडुंब भरुन वाहायला लागले आणि गोदावरी नदीतील पाण्याचा प्रवाह बघण्यास असुसलेल्या परभणी जिल्हा वासीयांच्या नजरा गोदावरीच्या वाकड्या वळणाचे नृत्य बघण्यासाठी वळले. जिल्ह्यात दिनांक 10 जुलै पासुन होत असलेल्या पावसांमुळे जिल्ह्यातील शेतकर्यांच्या पिकाला चांगलाच फायदा झाला असुन पिकांसह पाणी पातळी वाढण्यास मदत झाली आहे. त्यामुळे येत्या काळात होणार्या पावसाने जिल्ह्याच्या पाणी प्रश्नाची सोडवणुक करण्यास सुरुवात केली असल्याने जिल्ह्यातील नागरीकांतुन समाधान व्यक्त करण्यात येत आहेत. एकच लक्ष दोनकोटी वृक्ष या शासनाच्या धोरणावर शिकामोर्तब करुन सर्व परभणीकरांनी वृक्ष लागवडीत उत्स्फुर्तपणे सहभाग नोंदवला विविध ठिकाणी वृक्षांची लागवड केली. पर्यावरण संतुलन पावसाचे आगन पुन्हा-पुन्हा हिरवळ उभी करण्यासाठी हवे असेल तर वृक्षांचे संवर्धन अपेक्षीत आहे हा संदेश सर्वांपर्यंत पोहचवण्यात आला. या संदेशाची पोचपावती म्हणुन निसर्गाने सर्वांच्या तहानलेल्या शब्दांना वाट मोकळी करुन दिली आणि जिल्ह्यात जोरदार पुनरआगमन करत संपुर्ण जिल्हा जलमय करुन टाकला. चारा-पाण्यासाठी भटकंती करणार्या वन्य प्राण्यांचा हक्काचा जलसाठा उपलब्ध झाला. जिल्ह्यातील दुधना प्रकल्पासह, यलदरी, पुर्णा, राहटी बंधारे भरण्यास सुरुवात झाली. त्यामुळे येत्या काळात जिल्ह्यात पाऊस मोठ्या प्रमाणात होणार असल्याचे संकेत हवामान खात्याने वर्तविलेले आहेत. असे असले तरी होत असलेल्या पावसामुळे जिल्ह्यात हर्षउल्हासाचे वातावरण निर्माण झाले असल्याने प्रत्येक जन पावसाळ्यातील आनंदाचा उपभोग घेत असल्याचे चित्र शहरासह ग्रामीण भागात दिसुन येत आहे. पावसाळ्यातील फॅशन लुप्त होण्याचा मार्गावर आहे की काय असे चिन्ह दिसुन येत असतांना आज परभणी शहरात मोठ्या प्रमाणात रेनकोटधारक वाहनांवरुन मोज-मजा करतांना प्रथमच पहायला मिळाले. रस्त्याच्या दोन्ही बाजुने आडोशाला उभे राहत पावसाच्या सरीचे निरीक्षक करणारे नागरीक तिन वर्षाची तहान भागत असल्याच्या भावना व्यक्त करत होते. असे असले तरी शेतकर्यांच्या अडचणीत वाढ होवू नये यासाठी संतुलीत पावसाची आवश्यक्ता आहे. यावर्षी खरिपाच्या पिकांचे पोषण योग्य वेळी होत असुन कडधान्याची पिकांची पेरणीचे क्षेत्रा वाढल्याचे सांगण्यात येत आहेत. त्यामुळे कडधान्याच्या पिकाला पोषक पाऊस जर होत गेला तर शेतकरी आर्थिक अडचणीतुन वर येण्यास वेळ लागणार नाही. त्यामुळे अतीवृष्टीचा धोका टळो आणि शेतकर्यांना भर-भरून उत्पन्न मिळो अशा अपेक्षा पंढरपुरचे वारकरी करायला विसरणार नाहीत येवढे खरे. सद्यस्थितीला जिल्ह्यात सर्वत्र पाऊस आपल्या मर्जीने बरसत आहे.
जिल्हयात दिनांक 11 जुलै 2016 रोजी सकाळी 8.00 वाजता संपलेल्या चोवीस तासात सरासरी 9.93 मी.मी. पावसाची नोंद झाली आहे. या कालावधीत पूर्णा तालुक्यात सर्वाधिक 34.80 मि.मी. पाऊस झाला. जिल्हयात दिनांक 11 जुलै रोजी झालेला तालुका निहाय पाऊस पुढील प्रमाणे असून सर्व आकडेवारी मिलीमीटर परिमाणात आहे. कंसातील आकडेवारी चालु हंगामातील आजवरच्या एकूण सरासरी पावसाची आहे. परभणी 8.13 (173.62), पूर्णा 34.80 (260.90) गंगाखेड, 1.75 (122.50) पालम, 3.00 (134.69), सोनपेठ, 2.50 ( 214.25), सेलू 12.00 (259.90), मानवत, 7.33 ( 206.99) पाथरी, 10.00 (182.98), जिंतूर, 9.83 (213.99) पावसाची नोंद करण्यात आली आहे.

