इसिसशी संपर्कात असलेल्या तरुणाला परभणीतून अटक
परभणी, दि. 15 - महाराष्ट्रातील तरुण सोशल मीडियाच्या माध्यमातून इसिसशी संपर्क साधत असल्याचे पुन्हा एकदा समोर आले असून, इसिसशी संपर्कात असल्याच्या संशयावरून एका तरूणाला गुरूवारी परभणीतून अटक करणयात आली आहे. नसीरबिन याफी चाऊस असं अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. धक्कादायक म्हणजे नसीरबिन हा अवघ्या 21 वर्षांचा आहे. महाराष्ट्र दहशतवादी पथकाने ही कारवाई केली आहे. नसीरबिन चाऊस हा भारतात अतिरेकी कारवाई करण्याच्या तयारीत होता, असा आरोप त्याच्यावर आहे. सध्या सिरीयात असलेल्या फारूक या अतिरेक्याच्या आदेशावरुन तो याबाबतच्या हालचाली करत होता, त्यामुळेच त्याला एटीएसने अटक केली आहे.
