न्यायालयाच्या निर्णयातून मोदी धडा घेतील : गांधी
सरकारने शेतकर्यांकडे साफ दुर्लक्ष केल्याची सोनिया गांधींची टीका
नांदेड, दि. 15 - सर्वोच्च न्यायालयाने अरूणाचल प्रदेशमधली राष्ट्रपती राजवट संपुष्टात आणून, देशाचे संविधान आणि लोकशाही अबाधित राखली आहे. मोदी सरकार सत्तेसाठी उतावीळ झाले असून, ते उत्तराखंड आणि आता अरुणाचल प्रदेश या दोन राज्यातील राष्ट्रपती राजवटीवरून दिसून आले आहे. मात्र मोदी सरकारच्या या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयाने घटनाबाह्य ठरवल्यामुळे, आता तरी मोदी सरकार यातून धडा घेईल असे म्हणत काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी गुरूवारी मोदी सरकारवर कडाडून टीका केली. शंकरराव चव्हाण यांच्या स्मृतीदिनानिमित्त नांदेडमध्ये आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात त्या बोलत होत्या.लोकनेते डॉ. शंकरराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी आणि माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या हस्ते नांदेडमध्ये शंकररावांचा पूर्णाकृती पुतळा आणि स्मृती संग्रहालयाचे लोकार्पण झाले, त्यावेळी गांधी बोलत होत्या.
