Breaking News

भारताच्या जीडीपीतील वाढ प्रत्यक्ष 6 ते 6.5 टक्के

नवी दिल्ली, दि. 08 - जागतिक मागणी घटल्याने आणि जोखीम टाळण्याच्या प्रयत्नात यंदाच्या आर्थिक वर्षात भारतीय अर्थव्यवस्था 7.4 टक्क्यांच्या दराने काहीशी  संथपणे वाढेल, असे भाकीत एचएसबीसीने वर्तवले आहे. जीडीपी आकडेवारी मोजण्याच्या पद्धतीतील अडचणींकडेही त्यांनी नामनिर्देश केला आहे.
जागतिक वित्तीय सेवाविषयक प्रमुख कंपनीने म्हटले आहे की, जागतिक घटलेली मागणी, बँकिंग क्षेत्राचा जोखीम टाळण्याचा प्रयत्न, देशांतर्गत खासगी गुंतवणुकीचे  कमी प्रमाण, तेलाच्या हळूहळू वाढत चाललेल्या किमती यांचा परिणाम अर्थव्यवस्थेवर होत आहे.
सर्व गोष्टींचा विचार केला असता जीडीपीतील वाढ 7.6 टक्क्यांवरून घसरत 7.4 टक्क्यांनी होईल आणि आणखी घसरून 2917-18 मध्ये 7.2 टक्क्यांवर येईल, असे  एचएसबीसीने एका संशोधन टिप्पणीत म्हटले आहे. जागतिक स्तरावर अर्थव्यवस्थेच्या वाढीची ही सर्वोत्तम कामगिरी असेल, असेही त्यांनी नमूद केले आहे. शहरी  भागातील मागणी वाढल्याने भारताच्या जीडीपीची पहिल्या तिमाहीत वाढ तब्बल 7.9 टक्के इतकी होती.