Breaking News

11 कोटी लिटर पाण्याचे वितरण

लातूर, दि. 09 -  लातूर शहरास पाणीपुरवठा होत असलेले मांजरा धरण कोरडे पडल्याने लातूर शहरातील नागरिकांना तीव्र पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. विलासराव देशमुख यांची लातूर विषयी सामाजिक बांधिलकीची भावना होती. लातूरच्या जनतेच्या सुख दु:खात ते नेहमी सहभागी होत असत. हाच वसा आणि वारसा आमदार अमित देशमुख जोपासत आहेत. ही प्रेरणा घेऊन विलासराव देशमुख फाऊंडेशनच्या माध्यमातून लातूर शहर व ग्रामीणमधील 27 गावांना 21 मार्च पासुन सेवाभावी वृत्तीने पाणीपुरवठा केला जात आहे. आजपर्यंत. 106 दिवसात साधारणपणे 11 कोटी 5 लाख लिटर पाण्याचे वितरण केले आहे.