हरीत चळवळीमध्ये प्रत्येकाने सहभाग घ्यावाः जिल्हाधिकारी
बुलडाणा, दि. 01- राज्य सरकार उद्या 1 जुलै 2016 रोजी महत्वांकांक्षी दोन कोटी वृक्षारोपण कार्यक्रम हाती घेणार आहे. याबाबत प्रशासकीय पातळीवर जय्यत तयारी करण्यात आली आहे. हरीत चळवळ बनलेल्या या मोहिमेत सर्वांनी हिरीरीने सहभाग घ्यावा. सामाजिक वनीकरण व वन विभाग यांच्याकडून रोपे मिळवून घ्यावीत. रोपे मिळण्यामध्ये काही अडचण असल्यास सामाजिक वनीकरण व वन विभागाच्या कार्यालयांशी संपर्क करावा. वृक्षारोपण करून पर्यावरणाचा ढासाळलेला समतोल राखण्यामध्ये शासनाला मदत करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विजय झाडे यांनी केले आहे.
शहरामध्ये सकाळी 8 वाजता जिल्हाधिकारी यांच्या निवासस्थानी सर्वप्रथम वृक्षारोपण जिल्हाधिकारी डॉ. विजय झाडे यांच्याहस्ते करण्यात येणार आहे. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात निवासी उपजिल्हाधिकारी यांच्याहस्ते वृक्षारोपण कार्यक्रम होणार आहे. सामाजिक वनीकरण व वन विभागाच्यावतीने वृक्षारोपणाचा मुख्य कार्यक्रम सकाळी 9 वाजता पंचशील चौकस्थित लाकूड आगारात होणार आहे.
पर्यावरण समतोल राखणार्या या चळवळीमध्ये जिल्ह्यातील सामाजिक संस्था, खाजगी व्यापारी संस्था, बँका व खाजगी कंपन्यांनी या कार्यक्रमात सहभाग घेवून वृक्षारोपण करावे. घराच्या परीसरात, खुली जागा असेल तिथे, कार्यालय, शाळा, महाविद्यालये परीसर, खाजगरी कंपनी परीसर व वैयक्तिक स्तरावर वृक्षारोपण करावे. रोपे खाजगी व्यवस्थापनही देत आहेत. त्यांचाही लाभ घ्यावा.