सांगलीला पुन्हा पावसाचा जोर
सांगली, दि. 19 - गेले दोन दिवस पाऊस पुन्हा सुरु झाला. काल पावसाच्या किरकोळ सरी चालू होत्या. आज मात्र पावसाने चांगलाच जोर धरला. पुनर्वसन नक्षत्राचा पाऊस अंतिम टप्प्यात पडत आहे हे नक्षत्र (मंगळवारी) संपून पुष्य (तरुण) पावसाचे नक्षत्र सुरु होत आहे.गेले चार दिवस पावसाने उघडीप दिली होती. काल दुपारनंतर पुन्हा किरकोळ स्वरुपात पाऊस पडत होता. आज दिवसभर ढगाळ वातावरणात पावसाने जोर धरला आहे. पश्चिम भागात दमदार पाऊस पडत आहे. तर पूर्वभागात तुरळक सरी पडत आहेत.
चार दिवसापूर्वी कृष्णेच्या पाण्याची (सांगलीजवळ) पातळी 36 फुटावर गेली होती. ती आता 12 फुटावर आली आहे. सध्याच्या पावसामुळे पुन्हा नद्यांना पाणी वाढण्या
ची शक्यता आहे.