देऊळगांव महि मध्ये सर्रास गांजा विक्री चालू!
देऊळगांव महि (प्रतिनिधी) दि. 05 - येथे तालुक्यातील सर्वात मोठी बाजारपेठ आहे. त्यामुळे येथे लगतच्या खेड्यातील नागरिकांची नेहमीच वर्दळ असते त्यामुळे येथे अवैध धंद्यांना ऊत आला असून खुलेआम गांजा विक्री केल्या जात असल्याचे चित्र दिसून येते त्यामुळे तरुणांमध्ये व्यसनाधीनता वाढत चालली आहे. दे.महि येथे गांजा विक्री जोमात चालु आहे. येथे तरुणासोबत वृध्दांनाही गांजाच लत लागत असल्याचे दिसून येत आहे. गांजा सारख्या तसेच इतर पदार्थावर कायद्याने राज्यात बंदी असतांनाही दे.महि येथे मात्र खुलेआम विक्री होतांना दिसून येत आहे. अवघ्या काही रुपयांमध्येच छोटे-छोटे गांज्याचे पाऊच येथील दुकानाबाहेर सहज उपलब्ध होत असल्याचे दिसून येते. गावासह इतर लगतच्या खेड्यात तरुणांचाही याकडे ओढ वाढत असून यावर लक्ष देण्याची मागणी सुज्ञ नागरीकांकडून होत आहे. पोलीस प्रशासनाला याबाबत माहिती असतांना कारवाई करण्यात का धजावत नसल्याचा प्रश्न येथील नागरिकांना पडला आहे. त्यामुळे त्यांच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. एवढे मात्र खरे!
