बुलडाणा तालुक्यात अवैध दारू विक्रीवर छापा
बुलडाणा, दि. 05 - बुलडाणा तालुक्यातील कोलवड, हतेडी खु व चिखला शिवारात राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने अवैध दारू धंद्यावर छापा टाकला. यावेळी महाराष्ट्र दारूबंदी कलम 65 ड नुसार या गावच्या शिवारातील गजानन श्रीरंग गायकवाड रा. कोलवड, सतिश सुधाकर पन्हाळे रा. हतेडी खु व शालीक प्रकाश जाधव रा. चिखला यांच्यावर अवैधरित्या हातभट्टी दारू व देशी दारूची विक्री करताना कारवाई करण्यात आली. तसेच गुन्हा नोंदविण्यात आला.
या कारवाईत सर्व आरोपींच्या ताब्यातून 10 लीटर गावठी दारू, 264 देशी दारूच्या 180 मि.ली क्षमतेच्या बाटल्या असा एकूण 13 हजार 347 रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सदर कार्यवाही अधिक्षक एस.एल कदम यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी निरीक्षक व्ही. एम पाटील, सहायक दुय्यक निरीक्षक जी. व्ही पहाडे, जवान एस.बी निकाळजे, आर.ए कुसळकर व व्ही. बी सुर्यवंशी यांनी केली.