Breaking News

पाऊसामुळे ठाण्याच्या रस्त्यावर खड्डेच खड्डे

ठाणे, दि. 14 - यंदा पावसाळ्यात खड्डे पडणार नसल्याचा दावा पालिकेने केला असला तरी पावसाने त्यांचा दावा फोल ठरवला आहे. महापालिकेने केलेल्या सर्व्हेत शहरात आजघडीला 888 खड्डे असल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये 2 हजार 138.25 चौरस मीटरचे क्षेत्रफळ या खड्ड्यांनी व्यापले आहे. तर, यामध्ये सर्वाधिक 264 खड्डे हे वागळे प्रभाग समितीत पडले आहेत. यापैकी 674 म्हणजेच 1599.75 चौरस मीटरचे खड्डे बुजवल्याचा दावा पालिकेने केला असला तरी ज्याज्या भागात ते बुजवले आहेत, त्यात्या ठिकाणी पुन्हा खड्डे होत असल्याचे चित्र आहे.