Breaking News

मनजित चिल्लर दुखापतग्रस्त

बंगळूर, दि. 14 - प्रो कबड्डी लीग दुसर्‍या चरणात येऊन पोहचली. सर्व सामन्या अतितटीचे होत असतांनाच पुणेरी पलटणच्या मनजीत चिल्लरला दुखातप झाली आहे. आगामी काही सामन्यात तो  मुकण्याची शक्यताताही आहे. बंगाल वॉरियर्सविरुद्ध झटापटीच्या वेळी जखमी झालेला मनजित चिल्लर याची दुखापत गंभीर असल्याचे समजते. याबाबत पुणेरी पलटनने आज तरी काहीही बोलणे टाळले आहे.
बंगाल आक्रमकाची पकड करण्याच्या, तसेच त्यानंतर काही वेळातच चढाई करताना झालेल्या झटापटीच्या वेळी मनजित जखमी झाला होता. मनजितची दुखापत पाहून बंगाल वॉरियर्सचा कर्णधार नीलेश शिंदेलाही चिंता वाटली होती. खेळाडूची दुखापत गंभीर दिसली की काळजी वाटते. आम्हाला आमच्या कंपनीकडूनही खेळायचे असते, असे त्याने सांगत जणू मनजितची दुखापत किती गंभीर आहे हेच सांगितले होते. पुणेरी पलटणची आगामी लढत शुक्रवारी तेलुगू टायटन्सविरुद्ध आहे.