Breaking News

बाल गोपालांच्या आषाढी दिंडीने नगरी दुमदुमली

गंगाखेड प्रतिनिधी, दि. 18 -  चंद्रभागा तीरी उभा मंदिरी तो पहा विठ्ठेवरी दुमदुमली पंढरी पांडुरंग हरी. विठ्ठल विठ्ठल जयहरीचे भजन गात गोदावरी पब्लीक इंग्लीश स्कुलचा बालगोपालानी काढलेल्या आषाढी दिंडीने जनाई नगरी दुमदुमली येथिल लेक्चर कॉलनीतील गोदावरी पब्लीक इंग्लीश स्कुलचा बाल गोपालानी आषाढी दिंडीचे आयोजन करण्यात आले पारंपारिक वारकरी वेषात विद्यार्थी सजले होते भजन टाळ डोक्यावर तुळशी इंद्रायन घेवुन विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठलचा जयघोष बाल गोपालाची आषाढी दिंडी मुख्य रस्त्याने टाळ वाजत निघाली शिस्त बध्द या दिंडीचे मुख्य आकर्षण होते. विठ्ठलाचे नामस्मरण व जयघोषात दिंडी श्री संत जनाबाई मंदिराकडे प्रस्थान झाली. सर्व विद्यार्थ्यांना संत जनाईचा दर्शनानंतर श्री विठ्ठलाची आवडती भक्ती जनाबाई बाबत माहिती  देण्यात आली. व फळ वाटप करण्यात आले. आषाढी दिंडी यशस्वीसाठी जी.बी.कांदे, एम.बी.लोखंडे, पी.एल.भोसले, जी.जी. कदम, काजळे, लोखंडे यांनी प्रयत्न केले.