Breaking News

चांगल्या कामासाठी सेनेचा राष्ट्रवादीला जाहीर पाठींबा ः श्रीरंग बारणे

पुणे, दि. 10 - मात्र आमच्यात अद्याप मैत्री नाही, असे सांगताना दादांची तारांबळ राष्ट्रवादी व शिवसेनेच्या छुप्या मैत्रीबद्दल प्रसार माध्यमातून बर्‍याचवेळा बोलले जाते पण आज या चापेकर बंधूंच्या स्मारकाच्या उद्घाटन प्रसंगी मी जाहीर करतो की चांगल्या कामासाठी सेनेचा दादाला व राष्ट्रवादीला जाहीर पाठींबा आहे, असे उलट विरोध करणार्‍यांनी विरोध कोठे व कसा करावा याचा अभ्यास करणे गरजेचे आहे, असे म्हणत भाजलाच उलटा टोला शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे यांनी लगावला.
यावेळी व्यासपीठावर शिवसेनेचे, राष्ट्रवादीचे नगरसेवक तसेच भाजपचे खासदार अमर साबळेही उपस्थित होते. यावेळी बोलताना बारणे म्हणाले की, स्मारकाच्या उदघाटनासाठी काही जणांनी विरोध केला मात्र विरोध करताना यात राजकारण आणू पाहणार्‍यांनी राजकारण कोठे व कसे करावे तसेच ते करताना कोणाविरुद्ध राजकारण करत आहोत त्यांची उंची पहावी मग राजकारण करावे. केवळ वृत्तपत्रात आपले नाव यावे यासाठी राजकारण किंवा विरोध करणे ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे असा भाजपाला टोला लगावला.