आगुंडेवाडी येथे मुलींना सायकलींचे वाटप
सातारा, दि. 8 (प्रतिनिधी) - आगुंडेवाडी या गावातून मुला-मुलींना शाळेत जाण्याकरिता कोणत्याही वाहनांची सोय नसल्याने जिल्हा परिषद सदस्य संदीप शिंदे यांच्या विशेष प्रयत्नाने आगुंडेवाडी येथील मुलींना सायकली वाटप करण्यात आल्या.
अत्यंत दुर्गम भागात डोंगरकपारीत वसलेल्या आगुंडेवाडी या गावात लोकांना शेतीशिवाय पैसे कमवायचा दुसरा कोणताही मार्ग नसल्याने गावातील बर्याच तरुणांना पैसे कमवण्यासाठी गाव सोडावे लागले आहे. सध्या गावांमध्ये फक्त वयोवृध्दाबरोबरच लहान मुलं आहेत. म्हणूनच ज्यांची संगोपनाची जबाबदारी त्यांच्या आई-वडिलांऐवजी आजोंबावर आली आहे. मुलांना आगुंडेवाडी ते कामठी असा 2 कि. मी. पायी प्रवास करावा लागतो. ही मुलांची पायपीट थांबावी या उद्देशाने संदीप शिंदे यांच्या विशेष प्रयत्नातून मुलांना सायकलीचे वाटप करण्यात आले.
यावेळी जिल्हा परिषद सदस्य संदीप शिंदे, गटविकास अधिकारी संतोष घाडगे, प्रवीण धुरळे, विस्तार अधिकारी धनावडे, सरपंच धनाजी अगुंडे, चांगदेव अगुंडे, राजाभाऊ गावडे, पिंटू पवार व लाभार्थी मुली उपस्थित होत्या.