सातारा तालुक्यातील ठोसेघरसह भांबवलीचे धबधबे फेसाळले
सातारा, दि. 8 (प्रतिनिधी) - कड्यावरुन अवखळपणे कोसळणारे पांढरे शुभ्र झरे, सर्वांगाला स्पर्श करणारा गारवा आणि दर्या खोर्यातून पावसाच्या सरींचा पिच्छा पुरवणारे दाट धुके, अशा अल्हाददायक वातावरणात कास पठार निसर्गप्रेमींना मोहिनी घालू लागले असतानाच ठोसेघर व भांबवली धबधबेही आता चांगलेच फेसाळू लागले आहेत. त्यामुळे पर्यटकांची आता गर्दी होऊ लागली आहे.
जिल्ह्याला निसर्गाने भरभरुन दिले आहे. पश्चिम भागातील घाटमाथ्यावर असलेल्या कास पठारावर येण्यासाठी यवतेश्वरपासून धुक्याची टोपी घातलेल्या डोंगररांगा दिसतात. कास परिसराबरोबरच ठोसेघर, सज्जनगड, चाळकेवाडी, उरमोडी धरण, सांडवली धबधबा परिसरही पर्यटकांना खुणावू लागला आहे. समर्थांच्या भूमित प्रवेश केल्यानंतर लागणार्या विस्तीर्ण पठारावरील पवनचक्क्यांची पातीही धुक्यात हरवू लागली आहेत. ठोसेघर धबधबा तर आता चांगला फेसाळू लागला आहे. डोंगर कपारीतील ओघळ खळखळून वाहू लागल्याने धबधबा ओसंडून वाहत आहे त्यामुळे पर्यटक आवर्जून गर्दी करु लागले आहेत.
नागमोडी वळणे घेत जाणारा रस्ता, खोल दरीतून वर येणारे धुके मोकळा भाग आपल्या कवेत घेत असल्याने कास, ठोसेघर पठार पावसाळी हंगामात धुक्यात हरवून गेले आहे. कासला जाताना लागणार्या यवतेश्वर घाट काही प्रमाणात धोकादायक झाला असला तरी येणारे पर्यटक क्षण आनंदात घालवत असल्याचे दिसते. दाट धुक्यामध्ये पठार कापत गेले असून रस्त्यांशिवाय काही दिसत नाही. काहीवेळा सुरक्षेचे उपाय म्हणून वाहनांच्या हेडलाईट लावूनच पुढे जावे लागते. पावसाच्या सरी झेलत धुक्यातून वाट काढत जाण्याचा आनंद काही औरच असल्याने अनेकजण याचा मनसोक्त आनंद लुटत आहेत. कास पठारावर गेल्या काही दिवसांपासून पावसाचा जोर असल्याने परिसरातील निसर्गाची उधळण पहायला पर्यटकांची गर्दी होऊ लागली आहे. डोंगररांगांनी धुक्याची दुलई पांघरल्याने कासला जाण्याची ओढ निर्माण होऊ लागली आहे.