स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून वीज वितरण कंपनीच्या कार्यालयास टाळे
कराड, दि. 8 (प्रतिनिधी) - कोपर्डे हवेली येथील वीज वाहक तारा शेतात लोंबकळत असूनही त्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याने संतप्त झालेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी वीज वितरण कंपनीच्या ओगलेवाडी कार्यालयाला टाळे ठोकले. स्वाभिमानीच्या या पवित्र्यानंतर अधिकार्यांनी नरमाईची भूमिका घेत तातडीने वीज तारा सुरळीत करण्याचे आश्वासन दिले.
कोपर्डे हवेली येथे माजी सैनिक तानाजी चव्हाण यांची शेतजमीन असून, त्याठिकाणी त्यांनी पपईची बाग केली आहे. या पपईच्या बागेवरून वीज वाहक तारा गेल्या असून, खांबाचा ताण कमी झाल्याने या तारा लोंबकळत आहेत. तारांमधून वीज प्रवाह जास्त प्रमाणात असल्याने त्यापासून मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता निर्माण झाली होती. पपईच्या झाडांना या तारांचा स्पर्श होत असल्याने अपघात होण्याच्या भीतीने काही झाडे तोडण्याची वेळ आली. तसेच फांद्याही तोडल्या गेल्या. मात्र, तरीही या वीज तारांची दुरुस्ती करण्याबाबत वीज वितरण कंपनीने कोणतीही कार्यवाही केली नाही. वीज तारांची दुरुस्ती करण्याची मागणी तानाजी चव्हाण यांनी गतवर्षी वीज कंपनीच्या ओगलेवाडी कार्यालयात केली होती. मात्र, त्यांच्या अर्जाकडे अधिकार्यांनी दुर्लक्ष केले. त्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आंदोलन करून कार्यालयाला टाळे ठोकले.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कराड उत्तर तालुकाध्यक्ष सचिन नलवडे, नितीन जाधव, दिनकर जाधव, तानाजी चव्हाण, दादासाहेब पाटील, दत्तात्रय घाडगे, योगेश झांबरे, साईराज कराडे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. दरम्यान, संबंधित वीज तारा हटविण्याबाबत तातडीने कार्यवाही करण्याचे आश्वासन वीज कंपनीच्या अधिकार्यांनी दिले. त्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आंदोलन मागे घेतले.