समाजप्रबोधनासाठी अभियनकला आवश्यक- डॉ.प्रा.फौजिया खान
परभणी, दि. 18 - अभिनयाच्या माध्यमातुन समाज प्रबोधनासाठी उपयुक्त नाटके, चित्रपट, चित्रिफिती याचा वापर केल्यास योग्य मार्गदर्शन कलावंताकडुन मिळु शकते असे प्रतिपादन माजी सांस्कृतिक राज्यमंत्री डॉ.प्रा.फौजिया खान यांनी येथे संपन्न झालेल्या महाराष्ट्र स्कुल ऑफ ड्रामा च्या उदघाटन प्रसंगी केले.शहरातील अष्टविनायक कला, क्रिडा व सेवा प्रतिष्ठानच्यावतिने महाराष्ट्र स्कुल ऑफ ड्रामा ही अभिनय कार्यशाळा सुरू करण्यात आली आहे.याचा उदघाटन सोहळा दि.16 जुलै रोजी मोठया उत्साहात संपन्न झाला. या वेळी आपल्या भाषणातुन बोलतांना फौजिया खान यांनी जिल्ह्याला अशा ड्रामा स्कुलची नितांत अवश्यकता असल्याचे सांगुन काळाची गरज ओळखुन तसेच अभिनय क्षेत्रातील संधी विचारात घेता अशा स्कुलची शहरातील व जिल्ह्याबाहेरील गरजुंना आवश्यक असल्याचे सांगीतलेे.या माध्यमातुन अनेक कलावंत प्रक्षिशण घेतिल आणी परभणीचा नावलौकिक सातासमुद्रपार नेतिल अशी अपेक्षाही व्यक्त केली.या वेळी जिल्हा नियोजन समितीचे सदस्य बाळासाहेब जामकर, सिने पत्रकार शंकर इंगळे, चित्रपट स्टंटमॅन फाईट मास्टर रशिद खान उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक मधुकर उमरीकर यांनी केले तर सुत्रसंचालन प्रणिता देशपांडे व आभार वैभव बल्लाळ यांनी केले.हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मनिषा उमरीकर, महेश जोशी, योगेश पांडे, सुधिर चिद्रवार, प्रकाश बारबिंड, बालनाथ देशपांडे, संदिप राठोड, अनिल दाभाडकर, अर्पणा जोशी आदिंनी परिश्रम घेतले.