व्यापार्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन
सांगली, दि. 14 - शेतीमाल नियमन मुक्तीच्या धोरणाला विरोध करणार्या व्यापार्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे सांगलीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून दहन करण्यात आले. शासनाच्या निर्णयाला विरोध करणार्या व्यापार्यांचे परवाने बाजार समितीने त्वरीत रद्द करावेत. व्यापार्यांनी आडमुठी भूमिका बदलली नाही तर, तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही देण्यात आला आहे.
आंदोलनामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रवक्ते महेश खराडे, जिल्हाध्यक्ष विका
स देशमुख, संजय बेले, महावीर चौगुले, संदीप राजोबा, अशोक मगदूम, हरिभाऊ कांबळे, संभाजी मेंढे, भारत चौगुले, शीतल पाटील, अभिजित पाटील, स्वप्नील बिरनाळे, नितीन पाटील, सुहास पाटील, महावीर पाटील आदी सहभागी होते. शेतीमाल खरेदीसाठी अडवणूक करणार्या व्यापार्यांविरोधात घोषणाबाजी देत संघटनेच्या कार्यकर्त्यांनी सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये व्यापार्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन केले. शेतकर्यांची अडवणूक करणार्या व्यापार्यांना जशास तसे उत्तर देण्यात येईल, असा इशाराही आंदोलकांनी दिला.
मागण्यांचे निवदन सांगली कृषी उत्पन्न बाजार समिती सभापतींना देण्यात आले. यामध्ये म्हटले आहे की, देशात बाजार समितीचे आदर्श मॉडेल मंजूर करण्यात आले. केंद्राच्या निर्णयाची राज्य सरकारने अंमलबजावणी केली आहे. राज्यात कोठेही व्यापार्यांचा विरोध नसताना येथेच शेतकर्यांची अडवणूक कशासाठी? शासनाने चांगला निर्णय घेतला असून, यामध्ये शेतकरी व्यापार्यांच्या तावडीतून सुटला आहे. शिवाय त्यांना अडतही भरावी लागत नाही. शेतकर्यांकडून थेट ग्राहकांना शेतीमाल उपलब्ध होणार असल्यामुळे कमी दरात मिळणार आहे. अडवणूक करणार्या व्यापार्यांचे परवाने निलंबित करावेत.