आषाढीवारीसाठी सातारा विभागामार्फत ग्रुप बुकींग सुविधा
सातारा, दि. 05 (प्रतिनिधी) - आषाढीवारीसाठी पंढारपूरला जाणार्या भाविकांसाठी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या सातारा विभागाकडून पहिल्यांदाच ग्रुप बुकींगची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. सातारा विभागातील 11 आगारामध्ये ही सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्याची माहिती विभाग नियंत्रक धनाजी थोरात यांनी दिली.
ही बस संबंधित गावातून सोडली जाणार आहे. जादा गाडीस कोणतेही जादा शुल्क आकारले जाणार नाही. नियमित तिकीटावर हा प्रवास भाविक प्रवाशांना करता येणार आहे. त्यासाठी प्रत्येक आगारातील बसस्थानकावर ग्रामस्थांनी आपली मागणी नोंदवावी.
ज्या गावात 40 पेक्षा अधिक भाविक पंरढरपुरला जावू इच्छितात त्यांच्यासाठी ग्रुप बुकिंगची सुविधा असणार आहे. ग्रामस्थ एकत्र येवून त्यांनी एसटीच्या आपल्या परिसरातील आगाराकडे बसची मागणी करावयाची आहे. ग्रामस्थांनी प्रवासाची तारीख आणि वेळ आगाराकडे दिल्यानंतर तात्काळ गाडी उपलब्ध करुन दिली जाणार आहे. जादा गाड्यांसाठी कोणतेही जादा शुल्क असणार नाही. गावापासून ते पंढरपूरपर्यंत जे तिकीट असेल तेच तिकीट आकारले जाईल. ग्रामस्थांचा प्रवास प्रत्यक्ष त्यांच्या गावामधून सुरु होवून त्यांच्याच गावात संपेल. ही सुविधा 9 जुलै ते 12 जुलै 2016 या कालावधीसाठी सुरु करण्यात आली आहे. अधिक माहितीसाठी विभागीय कार्यालय (02162) 239479, आगार व्यवस्थापक, सातारा (02162) 230064, आगार व्यवस्थापक कराड (02164) 222563, आगार व्यवस्थापक कोरेगाव (02163) 220221, आगार व्यवस्थापक फलटण (02166) 222379, आगार व्यवस्थापक वाई (02167) 220680, आगार व्यवस्थापक पाटण (02372) 283036, आगार व्यवस्थापक दहिवडी (02165) 220248, आगार व्यवस्थापक महाबळेश्वर (02168) 260485, आगार व्यवस्थापक मेढा (02378) 285259, आगार व्यवस्थापक पारगाव खंडाळा (02169) 252245, आगार व्यवस्थापक वडूज (02161) 231070 अधिक माहितीसाठी या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा. या बुकींग सुविधेचा भाविकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन विभाग नियंत्रकांनी केले आहे.