Breaking News

गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा ध्यास घ्या -बागडे

औरंगाबाद, दि. 10 - गुणवत्तापूर्ण शिक्षण जीवनात प्रत्येक प्रसंगाला यशस्वीरित्या सामोरे जाण्याचे शिकविते. विद्यार्थ्यांनी बौध्दिक क्षमतेवर अभ्यास करून गुणवत्तेचा ध्यास घ्यावा. शिक्षकांनीही पुस्तकी ज्ञानाबरोबरच आजच्या स्पर्धात्मक युगाची ओळख विद्यार्थ्यांना देऊन, सर्वगुण संपन्न बनवावे, असे प्रतिपादन विधानसभाध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी येथे केले.
वरूड काजी येथील जिल्हा परिषदेच्या जिल्ह्यातील पहिल्या टॅबयुक्त शाळेच्या ई-वर्ग खोलीचे उद्घाटन व शाळा खोली बांधकामाच्या भूमिपूजन कार्यक्रमात ते बोलत होते. सरपंच संजय दांडगे, माजी सरपंच डॉ. दिलावर बेग, कृषी उत्पन्न बाजार समितीचे विकास दांडगे, मुख्य लेखा वित्त अधिकारी उत्तम चव्हाण, गटशिक्षणाधिकारी राकेश साळुंके, विस्तार अधिकारी विद्या दिक्षित, नवखोते, रघुनाथ काळे आदींची उपस्थिती होती.