Breaking News

महिला काँग्रेस कमिटीची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

बुलडाणा, दि. 11 - यवतमाळ पब्लीक स्कूलमध्ये झालेल्या दृष्कृत्यामध्ये सहभागी आरोपींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस कमिटीच्या सरचिटणीस जयश्रीताई शेळके यांनी 8 जुलै रोजी जिल्हाधिका-यांमार्फत मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
मुख्यमंत्र्यांना  दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, यवतमाळ शहरातील पब्लीक स्कुलमध्ये शाळेतील चिमुरड्या मुलींचे लैंगिक शोषण ही अतिशय निंदनीय घटना असुन माणुसकीला काळीमा फासणारी आहे. ज्ञानदानाचे कार्य हे अत्यंत पवित्रकार्य असून एकीककडे ‘मुले ही देवाघरची फुले’ असे म्हणत असतांना दुसरीकडे शाळेतील चिमुरड्या मुलीवर लैंगिक अत्याचार करण्याचा प्रकार हा अत्यंत घृणास्पद आणि लाजीरवाणा आहे. या दृष्कृत्याचा महाराष्ट्र महिला काँग्रेसने तिव्र निषेध व्यक्त केला आहे.
महिलांच्या संरक्षणाचे अनेक कायदे अस्तित्वात असतांनाही महिला व मुलींवरील अत्याचाराच्या व शोषणाच्या घटना वारंवार घडत असतील तर ती निश्‍चीतच गंभीर बाब आहे. म्हणूनच भविष्यात अशाप्रकारे स्त्रिंयावर अत्याचार करणा-या नराधमांना चाप बसविण्यासाठी शासनाने सदर दृ ष्कृत्यातील सहभागी सर्व आरोंपीवर कठोरात कठोर कारवाई करावी जेणेकरुन पुन्हा भविष्यात अशा प्रकारचा गुन्हा करण्यासाठी कोणी धजावणार नाही.
सदरचा खटला हा जलदगती न्यायालयात चालवविण्यात यावा अशी मागणी प्रदेश सरचिटणीस अ‍ॅड. जयश्रीताई शेळके, अध्यक्षा जि.प.बुलडाणा सौ.अलकाताई खंडारे, प्रदेश उपाध्यक्षा म.प्र.म.काँ. सौ.मिनलताई आंबेकर, महिला काँग्रेस जिल्हाध्यक्षा सौ.वर्षाताई वनारे, प्रमिलाताई गवई, सुनिताताई सुरोशे, शुभांगी बाहेकर, वर्षा खरात, मिना गव्हाणे, सरस्वती खासने, सौ.अर्चना टाले, सौ.अर्चना डुकरे, सौ.मिरात, सौ.सुनिता कलोरे, सौ.संगिता पहुरकर, कु. ज्योत्सना जाधव, बानोबी चौधरी, सौ.तेजस्विनी आर.सावळे यांनी केली आहे.