बीकेसीत अर्बन प्लाझा आणि सुपर मार्केट
मुंबई, दि. 14 - शहराचे व्यावसायिक केंद्र म्हणून बीकेसीची ओळख आहे. सर्वसाधारणपणे कार्यालयीन वेळेनंतर बीकेसीतील वर्दळ कमी होते. पण याच बीकेसीमध्ये दुकाने, उपाहारगृहे व सुपर मार्केट असणा-या इमारतीचे काम पूर्णत्वास येत असून हे अर्बन प्लाझा व मार्केट चालवून त्याची देखभाल करण्यासाठी एमएमआरडीएद्वारे एका कंपनीची निवड केली जाणार आहे. यासाठी एमएमआरडीएद्वारे ई-निविदा काढण्यात आल्या होत्या. या निविदा दाखल करण्याची मुदत 11 जुलै होती.
राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय कार्यालये, शासकीय कार्यालये, बँका यांचा समावेश असणा-या बीकेसीमध्ये नागरिक, व्यावसायिकांची सतत ये-जा सुरू असते. पण कार्यालयीन वेळेनंतर, शनिवार, रविवारी आणि इतर सुट्टयांच्या दिवशी ही वर्दळ कमी दिसते. पण व्यावसायिक केंद्र असणा-या बीकेसीत सतत वर्दळ राहावी यासाठी एमएमआरडीने अर्बन प्लाझा आणि सुपर मार्केट उभारण्याची योजना आखली.