Breaking News

बांगलादेशमधील बॉम्बस्फोटात 4 ठार

ढाका, दि. 07 - बांगलादेशमधील किशोरगंज येथे गुरुवारी रमजान ईदनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या नमाज पठणावेळी दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात एका पोलिस कर्मचार्‍यासह चौघांचा मृत्यू झाला असून, सातजण जखमी आहेत. दरम्यान एका दहशतवाद्यांला जिवंत पकडण्यात सैनिकांना यश आले आहे.
ढाका शहरापासून 100 किमी अंतरावर असलेल्या किशोरगंज येथे आज नमाज पठणाचे आयोजन करण्यात आले होते. या ठिकाणी विविध शहरांतून हजारो नागरिक एकत्र आले होते. या गर्दीला लक्ष्य करून दहशतवाद्यांनी हल्ला केला. या हल्ल्यात एका पोलिस कर्मचार्‍यासह चौघांचा मृत्यू झाला असून, सात जण जखमी झाले आहेत. अद्याप या हल्ल्याची जबाबदारी कोणत्याही दहशतवादी संघटनेने स्वीकारलेली नाही.