Breaking News

लिपिकांचे लेखणी बंद आंदोलन

सांगली, दि. 17 - जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या लिपिक वर्गीय कर्मचार्‍यांनी आजपासून विविध मागण्यांसाठी लेखणी बंद आंदोलन सुरु केले. यामध्ये जिल्ह्यातील 255 कर्मचारी सहभागी झाले. या आंदोलनास 60 टक्के प्रतिसाद मिळाला. खानापूर, शिराळा पंचायत समितीचे लिपिकही आंदोलनात सहभागी झाले.
जिल्हा परिषद, पंचाय समितीच्या लिपिकवर्गीय कर्मचार्‍यांच्या विविध मागण्या शासनस्तरावर प्रलंबित आहेत. त्या पूर्ण करण्याच्या मागणीसाठी लेखणी बंद आंदोलन सुरु केले आहे. जिल्हा परिषदेतील कर्मचार्‍यांनी शासनाच्या निषेधार्थ निदर्शने केली. जिल्ह्यात एकूण 455 लिपिकवर्गी कर्मचारी आहेत. यातील 255 कर्मचारी आंदोलनात सहभागी झाले. 25 कर्मचारी रजेवर होते.
ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, राज्य अर्थमंत्री दीपक केसरकर यांच्याबरोबर मा
गण्यासंदर्भात बैठक व चर्चा झाली. परंतु प्रशासनाकडून कोणतीच कार्यवाही झाली नाही. लिपिकवर्गीय कर्मचार्‍यांच्या ग्रेड पे सुधारणा करणे, प्रशासकीय बदल्याबाबत अन्यायकारक धोरण रद्द करणे, कर्मचार्‍यांच्या पाल्यास निशुल्क शिक्षण सवलत, अतिकालीक भत्ता मिळावा, पदोन्नतीधारकास वरिष्ठ पदाचे किमान मूळ वेतन मिळण्यासाठी अधिसूचनेत सुधारण करणे, लोकसेवा आयोगातर्फे होणार्‍या स्पर्धा परीक्षांसाठी जिल्हा परिषद लिपिकांना पंचेचाळीस वर्षे वयोमर्यादेपर्यंत परीक्षेस बसण्यास सवलत मिळावी, असे प्रसिध्दीस दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे.
खानापूर पंचायत समिती येथे लिपिकवर्गीय कर्मचार्‍यांनी विविध मागण्यांसाठी बेमुदत लेखणी बंद आंदोलन सुरु केले आहे. आमदार अनिल बाबर यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन कर्मचार्‍यांशी चर्चा केली. यावेळी त्यांना कर्मचार्‍यांनी मागण्यांचे निवेदन दिले. लेखणी बंद आंदोलनात शिराळा पंचायत समितीचे लिपिकवर्गीय कर्मचारी सहभागी झाले आहे.