Breaking News

मुंबईच्या पाणीसाठयात विक्रमी वाढ

मुंबई, दि. 15 - मुंबईला पाणीपुरवठा करणा-या धरणांमधील पाणीसाठयात चांगल्याप्रकारे वाढ होताना दिसत आहे. वर्षभराला लागणा-या पाण्याच्या तुलनेत पन्नास टक्के पाणीसाठा जमा झाला आहे.
तलावातील या पाणीसाठयामुळे महापालिका प्रशासन समाधान व्यक्त करताना दिसत आहे. मात्र, मागील दोन वर्षामधील पाणीसाठयाची आकडीवारी पाहता सध्या 66,627 कोटी लिटर जमा झालेला पाणीसाठा विक्रमी मानला जात आहे.
मुंबईला पाणीपुरवठा करणा-या मोडक सागर, तानसा, विहार, तुळशी, अप्पर वैतरणा, भातसा आणि मध्य वैतरणा आदी धरणांमधील पाण्याची पातळी वाढत आहे. यापैकी भातसा धरण क्षेत्रात चांगला पाऊस होत आहे. गुरुवारी सकाळी 6 वाजेपर्यंत घेतलेल्या नोंदीनुसार या सर्व धरणांमध्ये 66,627 कोटी लिटर पाणीसाठा जमा झाला होता.