मुंबईत किडनी रॅकेटचा पर्दाफाश
मुंबई, दि. 15 - मुंबईतील हिरानंदानी रुग्णालयातील किडनी रॅकेटचा पदार्फाश करण्यास पवई पोलिसांना यश मिळाले आहे. या प्रकरणी विजेंद्र बिसेन (42), भरत शर्मा (48), इक्बाल महमद मोहम्मद सिद्दिकी (35) व किसान ब्रिज किशोर जयस्वाल(28) या आरोपींना अटक केली आहे.
मुंबईत उघडकीस आलेल्या किडनी रॅकेटने सर्वत्र खळबळ उडाली आहे. यासंदर्भात रुग्णालयातील कर्मचारी व प्रशासनाने काहीही बोलण्यास त्यांनी नकार दिला.
अकोल्यातील किडनी तस्करी समोर आल्यानंतर राज्यव्यापी तपासाला वेग प्राप्त झा
ला होता. पोलिसांच्या तपासात या तस्करीची मुळं मुंबई व पुण्यात असल्याचेही उघड झाले होते.
मुंबईतील मोठया तीन रुग्णालयांत किडनी प्रत्यारोपणाच्या शस्त्रक्रिया घडल्याचे तपासात उघड झाले, अशी माहिती सूत्रांनी दिली. आता किडनी तस्करीत हिरानंदानी रुग्णालयाचे नाव समोर आल्याने रुग्ण व त्याच्या नातेवाइकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.