डोंगरी विभाग विकास कार्यक्रम आराखड्यास मान्यता
सातारा, दि.17 (प्रतिनिधी) - डोंगरी विकास कार्यक्रमांतर्गत सन 2016-17 साठी उपलब्ध निधीच्या दीडपट म्हणजे एकूण 810.84 लक्ष रकमेच्या कामास मंजुरी देण्यात आली.
येथील नियोजन भवनात डोंगरी विभाग विकास कार्यक्रम सन 2016-17 जिल्हास्त
रीय समितीची बैठक पालकमंत्री विजय शिवतारे यांच्या अध्यक्षतेखाल घेण्यात आली. यावेळी पशुसंवर्धन, दुग्धविकास, मत्स्य व्यवसाय मंत्री महादेव जानकर हे प्रमुख उपस्थित होते. बैठकीला जिल्हा परिषदेचे अध्यक्ष सुभाष नरळे, आमदार बाळासाहेब पाटील, आमदार जयकुमार गोरे, आमदार मकरंद पाटील, आमदार दीपक चव्हाण, आमदार शंभुराज देसाई, आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले, जिल्हाधिकारी अश्विन मुद्गल, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेश देशमुख, जिल्हा नियोजन अधिकारी हणमंत माळी उपस्थित होते.
बैठकीच्या सुरुवातीला नुतन मंत्री महादेव जानकर यांचे पालकमंत्री विजय शिवतारे यांनी पुस्तक आणि लोकराज्य मासिक देवून स्वागत केले. यावेळी माळी यांनी विषय वाचन केले. आजच्या या बैठकीत डोंगरी विभाग विकास कार्यक्रम सन 2015-16 अंतर्गत समितीने मान्यता दिल्याप्रमाणे प्रशासकीय मान्यता दिलेल्या कामांच्या यादीस कार्योत्तर मंजुरी देण्यात आली.
जिल्ह्यामध्ये डोंगरी विभागाचे सातारा, कोरेगाव, वाई, खंडाळा, महाबळेश्वर, जावली, पाटण, खटाव असे आठ पूर्ण गट व फलटण, माण, कराड हे तीन उपगट आहेत. सन 2016-17 करिता या कार्यक्रमांतर्गत पूर्ण गटासाठी प्रत्येकी 100 लक्ष आणि उपगटासाठी प्रत्येकी 50 लक्ष याप्रमाणे एकूण 950 लक्ष निधी अनुज्ञेय आहे. त्यापैकी जून 2016 अखेर या कार्यक्रमांतर्गत पूर्णगट तालुक्यासाठी प्रत्येकी 80 लक्ष आणि उपगट तालुक्यांसाठी प्रत्येकी 40 लक्ष याप्रमाणे एकूण 760 लक्ष निधी अर्थसंकल्पीय प्रणालीद्वारे (बीडीएस) वर उपलब्ध झाला आहे.
उर्वरित 190 लक्ष निधी अप्राप्त आहे. प्राप्त निधीतून जुन्या अपूर्ण कामांसाठी 409.44 लक्ष निधी विविध कार्यान्वयीन यंत्रणांना वितरीत करण्यात येणार आहे. अपूर्ण असलेल्या कामांसाठी वितरीत करावयाचा 409.44 लक्ष निधी वजा केल्यानंतर नवीन कामांसाठी 540.56 लक्ष निधी उपलब्ध होणार आहे. उपलब्ध निधीच्या दीडपट म्हणजे एकूण 810.84 लक्ष रकमेच्या कामास मंजुरी देण्यात आली.