काळ्या पैशावरील कर भरण्यास मुदतवाढ देण्याची शक्यता
नवी दिल्ली, दि. 08 - जाहीर केलेल्या काळ्या पैशावर कर भरण्यासाठीची मुदत सरकार वाढवून देण्याची शक्यता आहे. तसेच सरकारने रक्कम हप्त्याने भरण्याची उद्योगाची विनंती स्वीकारली आहे.
सध्या बाजारात रोख रकमेची कमतरता असून कर भरण्यासाठीची मुदत नोव्हेंबपर्यंत वाढवण्याचा विचार सरकार करत आहे, असे एका वरिष्ठ अधिका-याने सांगितले. काळा पैसा जाहीर केल्यावर त्यावरील कर भरण्यासाठी सरकारने खिडकी योजना लागू केली आहे. तिची मुदत किती महिन्यांनी वाढवता येईल, यावर सरकार मंथन करत आहे.
कर आणि दंडाची रक्कम ते हप्त्याने भरतील, असे आम्हाला सांगण्यात आले आहे, असेही हा अधिकारी म्हणाला. केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी उद्योग संघटना, चार्टर्ड अकाऊंटंट्स व कर व्यावसायिकांशी चर्चा केल्यावर सरकारकडून हे वक्तव्य आले आहे. 2016-17च्या अर्थसंकल्पात सरकारने या खिडकी योजनेची घोषणा केली होती.