Breaking News

आंबोलीत 100 इंचाच्यावर पाऊस

आंबोली, दि. 14 - राज्यात सर्वाधिक पावसाचे ठिकाण असलेल्या आंबोलीत पावसाने इंचांचे शतक ओलांडले आहे. आतापर्यंत 104 इंच पाऊस झाला. या वर्षी उशिरा सुरवात होऊन पावसाची स्थिती समाधानकारक आहे.
सर्वाधिक पावसाचे ठिकाण म्हणून आंबोलीची ख्याती आहे. सह्याद्रीच्या कड्यावरील हिलस्टेशन असलेल्या आंबोलीत वार्‍यांमुळे पावसाचा जोर जास्त असतो. थंड वातावरणामुळे येथे पावसाचे वेगळेपण ठळक दिसते. पावसाच्या प्रमाणाबाबत आंबोलीचा देशातील टॉप फाइव्हमध्ये क्रमांक लागतो. एरव्ही येथे 200 इंचांच्या खाली कधी पाऊस झाला नाही. गेल्या वर्षी राज्यात सगळीकडे दुष्काळी परिस्थिती होती. या वेळी पहिल्यांदाच 180 इंच इतका पाऊस झाला होता.