आदिवासी उमेदवारांकरीता स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण
नाशिक/प्रतिनिधी। 8 - आदिवासी उमेदवारांना शिपाई, लिपीक, ग्रामसेवक, तलाठी अशा वर्ग-3 व वर्ग-4 तसेच इतर पदांकरिता घेतल्या जाणार्या स्पर्धात्मक परिक्षेची पूर्व तयारी करुन घेण्याकरीता आदिवासी उमेदवारांकरीता कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता माहिती मार्गदर्शन केंद्र, कळवण येथे 1 ऑगस्ट 2016 ते 15 नोव्हेंबर 2016 पर्यंत साडेतीन महिने कालावधीचे स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
प्रशिक्षणासाठी उमेदवार अनु.जमाती (आदिवासी) प्रवर्गतील असावा. उमेदवारांचे किमान वय 18 वर्ष व 38 वर्षापेक्षा कमी असावे. उमेदवार किमान एस.एस.सी.परिक्षा उत्तीर्ण असावा. उमेदवारांचे नाव जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रात नोंदणी असणे आवश्यक आहे. प्रशिक्षण कालावधीत उमेदवारांना दरमहा रुपये एक हजार विद्यावेतन देय राहील. या अनु.जमाती प्रवर्गातील आदिवासी उमेदवारांनी 27 जुलै 2016 पर्यंत ऑनलाईन अर्ज सादर करावा. ऑफलाईन अर्ज स्वीकारण्यात येणार नाहीत. ऑनलाईन अर्ज ुुु.ारहरीेक्षसरी.र्सेीं.ळप या संकेतस्थळावर सादर करावे. अर्जासोबत शाळा सोडल्याचा दाखला (टी.सी), जातीचा दाखला किँवा जात वैधता प्रमाणपत्र, गुणपत्रक दहावी, बारावी, पदवी आणि जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे नोंदणी कार्ड याच्या सत्यप्रती जोडाव्यात.
मुलाखत 27 जुलै 2016 रोजी सकाळी 9.30 वाजता घेण्यात येईल. मुलाखतीस येणार्या उमेदवारांना कोणत्याही प्रकारचा प्रवास खर्च दिला जाणार नाही. तसेच प्रशिक्षण कालावधीत प्रशिक्षणार्थींना राहण्याची व भोजनाची व्यवस्था स्वत: करावी लागेल. यापूर्वी प्रशिक्षण घेतलेल्या उमेदवारांनी प्रशिक्षणासाठी अर्ज करु नयेत,असे संदीप गायकवाड, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन अधिकारी, कळवण जि. नाशिक यांनी कळविले आहे. अधिक माहितीसाठी या कार्यालयाचा दुरध्वनी क्रमांक 02592-222973 वर संपर्क साधावा.