Breaking News

तीन दिवसांत सुलतान’ 100 कोटींपार

मुंबई, दि. 10 - अवघ्या तीन दिवसात सलमान खानच्या सुलतान‘ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तब्बल 105 कोटींचा गल्ला जमवला. अवघ्या तीन दिवसांत इतकी कमाई  करणारा हा पहिलाच चित्रपट ठरला आहे.
सलमान खान आणि अनुष्का शर्मा यांची मुख्य भूमिका असलेला हा चित्रपट बुधवारी प्रदर्शित झाला. प्रदर्शनापूर्वीच त्याच्या 100 कोटींहून अधिक व्यवसायाची चर्चा  होती. काहींनी तर हा चित्रपट 300 कोटींहून अधिक कमाई करेल, असे सांगितले आहे. पहिल्या तीन दिवसांतच सुलतान‘ने 100 कोटींचा पल्ला गाठला. बुधवारी  37 कोटींची कमाई झाली.