Breaking News

बाजार समितीतील 225 व्यापारी 11 जुलैपासून बेमुदत संपावर

सातारा, दि. 11 (प्रतिनिधी) - राज्य शासनाने खरेदीदाराकडून अडत वसूल करण्याचा अध्यादेश काढला आहे. या निर्णयामुळे व्यापार्‍यांना मोठा फटका बसणार असून या निषेधार्थ सोमवार दि. 11 पासून सातारा बाजार समितीमधील सुमारे 225 अडतदार व्यापारी बेमुदत संपावर जाणार असल्याची माहिती सातारा जिल्हा आडते संघटनेचे अध्यक्ष व बाजार समितीचे संचालक काका धुमाळ यांनी पत्रकार परिषदेत दिली. प्रवीण कांबळे, मोहमदअली बागवान, राजू गोरे, इरफान बागवान आदी यावेळी उपस्थित होते. 
धुमाळ म्हणाले, शेतकर्‍यांचा माल खरेदी करणारी व्यापारी हे शेतकर्‍यांनी मुले आहेत. शासनाच्या या निर्णयामुळे हे व्यापारी देशोधडीला लागणार आहेत. आडतीविषयी शेतकर्‍यांच्यात अनेक गैरसमज आहेत. अनेक वेळा राज्याबाहेरील व्यापार्‍यांकडून शेतकर्‍यांची फसवणूक झाली आहे. फळे, भाजीपाला नियममुक्तीमुळे आता तेच धोके राज्यभर वाढतील. शेतकर्‍यांकडून अडत कमिशन घेतले जात असल्याने तरी त्यासाठी अनेक सुविधा उपलब्ध करुन दिल्या जातात. अडत खरेदीदारांकडून घेणे व्यापार्‍यांना अडचणीचे आहेत. खा. राजू शेट्टी यांनी अडत व्यापार्‍यांना बांडगूळ असल्याचे वक्तव्य केले होते. आम्ही बांडगूळ नसून स्वत:च्या भांडवलावर व्यवसाय करतो असे सांगत धुमाळ यांनी शेट्टींचा निषेध केला.