Breaking News

श्री.मुंगसाजी महाराज पतसंस्था एकलारा शाखेचा आज शुभारंभ


बुलडाणा, दि. 17 - 21 व्या शतकाच्या वेगवान बदलांचा प्रवाहात ग्रामीण भागाला सहभागी करून त्यांना मुख्य प्रवाहात जोडण्यासाठी श्री मुंगसाजी महाराज नागरी सहकारी पतसंस्था नेहमीच अग्रेसर राहिली आहे. हाच ध्यास घेवून 17 जुलै रोजी एकलारा येथे संस्थेच्या 7 व्या शाखेचा शुभारंभ नवनिर्वाचित काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष आमदार राहुल बोंद्रे यांच्या शुभहस्ते संपन्न होणार आहे.
श्री मुंगसाजी महाराज या महान संताच्या नावाने सन 2003 साली सुरू झालेल्या मुंगसाजी महाराज नागरी सहकारी पतसंस्थेकडे 25 कोटी रूपयांच्या ठेवी असून संस्थेने 18 कोटी रूपयांचे कर्ज वाटप करण्यात आले आहे. संस्था स्थापनेपासून सतत ऑडीट अ वर्गात असून संस्था सतत नफयात कामकाज करत आहे.  संस्थेने आत्तापर्यंत चिखली येथील मुख्यालयासह उंद्री, साखरखेर्डा, राउतवाडी, पेठ, देउळगाव मही, सिंदखेडराजा या शाखा जनेसेवेसाठी कार्यरत केलेल्या आहे. एकलारा येथे नवीन शाखेचा शुभारंभ जिल्हाध्यक्ष आ.बोंद्रे यांच्या हस्ते आयोजित करण्यात आला आहे.
एकलारा येथील शाखेच्या शुभारंभाला नागरिकांनी मोठया संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष दिपक देशमाने, उपाध्यक्ष मुरलीधर अग्रवाल, संचालक पुंडलीक बापु राउत, अनिल देशमुख, कन्हैयालाल भोजवानी, आनंद बोंद्रे, विजय जागृत, अभय तायडे, खालीदखॉ उस्मानखॉ, प्रकाश निकाळजे, सौ. उषाताई चौरे, सौ. कावेरीताई भराड, तज्ज्ञ संचालक खुशाल गोलानी, अ‍ॅड. एल. एस. बाहेकर, सल्लागार मंडळ प्रल्हाद अंभोरे एकलारा, लक्ष्मण आंभोरे एकलारा, शिवनारायण म्हस्के पांढरदेव, डॉ. संदिप म्हस्के पांढरदेव, सतिष आंभोरे एकलारा, गजानन वाघ आमखेड, कृष्णा मुरकुटे भोरसा भोरसी, किशोर सोळंकी पाटोदा, राजेश गवले एकलारा, सखाराम वैद्य पाटोदा, अतुल देशमुख अंबाशी, संजय काटोळे खैरव, बाळु काकडे बोरगाव काकडे, गोपाल पानगोळे एकलारा यांनी केले आहे.