ठाणे स्थानकातील सरकते जिने ‘सरकेनात’
ठाणे, दि. 07 - ठाणे रेल्वे स्थानकात 3 वर्षापूर्वी मोठा गाजावाजा करून लावलेले सरकते जिने ऐन गर्दीच्या वेळी मात्र प्रवाशांना धोका देत असल्याचे पाहायला मिळत आहे. ठाण्यातील रेल्वे स्थानकात प्रवाशांचा महासागर उतरत असल्याने या सरकत्या जिन्यांना त्याचा भार सहन होत नाही. त्यामुळे हे जिने वारंवार बंद पडत असल्याचे रेल्वेने सांगितले.
तसेच या जिन्यावरील इमर्जन्सी बटणे प्रवासी कुतूहल म्हणून दाबून बघत असल्याने हे जिने थांबत आहेत. यामुळे ऐन गर्दीच्या वेळी प्रवाशांना मोठा मन:स्ताप सहन करावा लागत आहे.
ठाण्याची वाढती गर्दी आणि अपुरे जिने लक्षात घेत रेल्वेने काही वर्षापूर्वी ठाणे रेल्वे स्थानकात मोठा पूल उभारला. मात्र तरीही प्रवाशांची कोंडी होत असल्याने रेल्वेने ठाणे रेल्वे स्थानकाच्या फलाट क्रमांक 3-4 आणि 5-6 वर सरकते जिने बसवले. या जिन्यांचे लोकार्पण 27 जून 2013 रोजी पार पडले. त्याचा वृद्ध, गरोदर महिलांना मोठा फायदा होत आहे.