आ.राहूल बोंद्रे यांच्या प्रयत्नातून प्रत्येकी 8 लाखाची मदत
बुलडाणा, दि. 18 - शेतात काम करत असतांना मौजे करवंड येथील अस्वलाचा हल्यात ठार झालेल्या मयत लालसिंग सेवा पवार व श्रीकृष्णनगर येथील शाम उत्तमराव जाधव यांच्या कुटूंबीयांना आ. बोंद्रे यांनी शासनस्तरावर पाठपुरावा करून दोन महिन्यांच्या आत प्रत्येकी 8 लक्ष रूपयांची मदत मिळवून दिली. त्या दोघांच्या पतक्ींना आज या धनादेशाचे वाटप आ. बोंद्रे यांच्या हस्ते चिखलीतील माळीभवन येथे करण्यात आले. यावेळी तालुका अध्यक्ष डॉ. सत्येंद्र भुसारी, बाजार समिती सभापती विष्णू पाटील, पाशु सेठ, माजी नगरपरिषद उपाध्यक्ष रफीकसेठ, जि.प.सदस्य अशोक पडघाण, शहराध्यक्ष प्रदिप पचेरवाल, दिपक देशमाने, किशोर कदम, माणिक जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती.
करवंड येथे शेतीकाम करत असतांना अस्वलांच्या दोन वेगवेगळया हल्यात मौजे करवंड येथील लालसिंग सेवा पवार व श्रीकृष्णनगर येथील शाम उत्तमराव जाधव यांचा या हल्यात मृत्यू झाला आहे. या दोघांच्या कुटूबीयांना शासनाची मदत तात्काळ मिळावी यासाठी व वाढत्या जंगली प्राण्यांच्या हल्लयांबाबत वनविभागाने उपाययोजना कराव्यात यासाठी 30 मे रोजी वनमंत्री ना. सुधीर मुनगंटीवार यांची भेट घेवून शेतक-यांच्या व्यथा मांडल्या होत्या. मृत्यू झालेल्यांना तात्काळ मदत व त्यांच्या कुंटूबांच्या पूनर्वसनासाठी त्यांच्या पाल्यांना शासकीय सेवेत घ्यावे अशी मागणी वन विभागाचे सचिव यांच्याकडे 30 मे रोजी निवेदनाव्दारे केली होती. आ. बोंद्रे यांच्या मागणीची दखल घेत वनविभागाने तात्काळ या दोघांना मदत करण्याच्या हेतूने प्रत्येकी 8 लांखाची मदत मंजूर केली. सदर मदतीचे धनादेश आज आमदार राहुलभाउ यांच्या हस्ते वन विभागाच्या अधिका-यांच्या उपस्थिती अपघातग्रस्त शेतक-यांच्या पत्नींना त्यांच्या कुटूंबियांच्या उपस्थितीत वाटप करण्यात आले. यावेळी काँग्रेस पदध्िधिकारी, कार्यकर्ते, वरवंड येथील नागरीकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन शाम वाकदकर यांनी तर आभार प्रदर्शन तालुकाध्यक्ष डॉ. सत्येंद्र भुसारी यांनी केले.