जीवनावश्यक वस्तू अन् डाळींची साठेबाजी करणार्यांवर कडक कारवाई जिल्हाधिकारी
जालना, दि. 19 - जिल्ह्यातील डाळींचे आयातदार, घाऊक आणि किरकोळ व्यापारी यांनी डाळी तसेच जीवनावश्यक वस्तुंचा साठा आणि विक्री करताना त्यामध्ये पारदर्शकता ठेवावी. जीवनावश्यक वस्तू विशेषत: डाळींची साठेबाजी आणि जादा भावाने विक्री करणार्यांवर जीवनावश्यक वस्तू अधिनियमाअंतर्गत कडक कायदेशीर कारवाई करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी शिवाजी जोंधळे यांनी केल्या आहेत.
जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन सभागृहामध्ये जिल्हाधिकारी शिवाजी जोंधळे यांच्या अध्यक्षतेखाली जीवनावश्यक वस्तुंचा काळाबाजार, प्रतिबंध व जिवनावश्यक वस्तुंचा पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी जिल्ह्यातील सर्व डाळींचे आयातदार, घाऊक व किरकोळ व्यापारी यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी मार्गदर्शन करताना जिल्हाधिकारी जोंधळे बोलत होते. या बैठकीस सहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकारी डी.एन. भारस्कर, नायब तहसिलदार गणेश पोलास यांची उपस्थिती होती.