तुर्कस्तानमध्ये लष्करी उठावाच्या प्रयत्नात 60 ठार
अंकारा, दि. 17 - तुर्कस्तानच्या लष्कराने सरकारविरोधात उठाव करण्याचा अयशस्वी प्रयत्न शुक्रवारी करण्यात आला असून, या उठावात 60 जण ठार झाले आहेत. तुर्कस्तान येथील विमानतळावर झालेल्या दहशतवादी हल्ल्याला अवघे काही दिवस उलटत नाहीत तोच लष्कराच्या या उठावामुले देशभरात पुन्हा तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
तुर्कस्थानचे राष्ट्राध्यक्ष तय्यिप एर्डोगन यांनी मात्र या उठावाचा डाव हाणून पाडल्याचा दावा केला असून, उठाव करणार्यांवर दिसताक्षणी गोळ्या घालण्याचे आदेश दिले असल्याचे सांगितले. त्याचबरोबर बंडखोर सैनिकांनी अपहरण केलेली विमानेही पाडण्याचे आदेश दिले आ
हेत. दरम्यान, तुर्कीतील माध्यमांच्या वृत्तानुसार, लष्कराच्या जनरलना ठार मारण्यात आले असून, 130 बंडखोर सैनिकांना ताब्यात घेण्यात आले आहे. तुर्कीच्या पंतप्रधानांनी ही माहिती दिल्याचे तेथील माध्यमांनी म्हटले आहे.मिळालेल्या माहितीनुसार लष्कराने ज्येष्ठ अधिकार्यास बंदी बनवले आहे. लष्करातील एका गटाने शुक्रवारी मध्यरात्री देशातील लोकशाही सरकारविरोधात उठाव केला, बंडखोरांनी हेलिकॉप्टरमधून केलेल्या हल्ल्यात 17 पोलिसांसह काही निरपराध नागरिकही मारले गेले असून, मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती व्यक्त होत आहे. बंडखोर सैनिकांनी तुर्कस्तानच्या संसदेवरही बॉम्बहल्ला केला आहे, मात्र पोलिसांनी प्राणपणाने लढा देत हा हल्ला परतवून लावला आहे. तसेच 120 जणांना अटक करण्यात आली आहे. लोकशाहीला नुकसान पोहोचणार्यांचे प्रयत्न कधीही यशस्वी होणार नाहीत, देशातील सध्या स्थिती नियंत्रणात आहे. लष्कराची ही चाल यशस्वी होणार नाही, देशातील सत्तापालट करण्याचा प्रयत्न करणार्यांना मोठी किंमत चुकवावी लागेल असे पंतप्रधान येल्डरिन यानी म्हटले आहे. तर राष्ट्रपती इर्दोगन यांनी देशवासियांना शांतता राखण्याचे आवाहन केले आहे. या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. दरम्यान भारतीय विदेश मंत्रालयाचे प्रवक्ता विकास स्वरुप यांनी अंकारामधील भारतीय नागरिकांना तेथील परिस्थिती शांत होईपर्यंत नागरिकांना घराबाहेर न येण्याचे आवाहन केले आहे. भारतीय नागरिकासांठी हेल्पलाईन क्रमांक जारी करण्यात आला असून तो +905303142203 असा आहे.